दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

मुंबई | कोरोनाचा धुमाकूळ राज्यात कमी होताना पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाची रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. परंतु राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

‘गेल्या आठ महिन्यातल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचा अनुभव आता सरकारकडे असून त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. आरोग्य यंत्रणाही आता सक्षम झाली, असल्याचे टोपे म्हणाले आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यापासून राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना राजेश टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यातल्या कोविड रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही १५ लाख २४ हजारांवर गेली आहे. ४ हजार ९ नवे रुग्ण दिवसभरात आढळून आलेत. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला.

 

महत्त्वाच्या बातम्या
तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.