१५ वर्षे जुन्या गाड्या भंगारात जाणार, नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्क्रॅपेज पॉलिसीला मंजुरी दिली आहे. या पॉलिसीनुसार देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या जुन्या गाड्या थेट भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसुचित केली जाणार आहे. देशातील १५ वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या गाड्यांबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून केली जाईल.

केंद्र सरकारने २६ जुलै २०१९ रोजी यादिशेने पहिले पाऊल उचलले होते. इलेक्ट्रीक वाहनांना चालना मिळण्यासाठी १५ वर्षे जुनी वाहने भंगारता काढण्यास मंजुरी देण्यासाठी मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्याच्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.

दरम्यान, हा नियम २०२२ पासून लागू होणार असल्याने जुनी वाहने आणखी सव्वा वर्षे वापरता येणार आहेत. याच्या प्राथमिक टप्प्यात सरकारी वाहने आणि पीएसयूएस वाहनांवर ही कारवाई केली जाणार आहे.

गडकरी यांनी यापुर्वी ८ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स वसूल केला जाणार असल्याच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. जुन्या वाहनांमुळे प्रदूषण अधिक होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी येणारा खर्चाचा काही हिस्सा हा जुन्या वाहनांवर कर लावून वसूल केला जातो. या कराला ग्रीन टॅक्स असं म्हणातात. या पैशातून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना केल्या जातात.

हा नियम लागू करण्याआधी केंद्र सरकारकडून याबद्दलचा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठविला जाणार आहे. तसे रांज्यांकडून सल्ला घेतला जाणार आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सरसकट १५ वर्षे झालेल्या ट्रान्सपोर्ट आणि खासगी वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी लागू करण्याच्या विचारात आहे.

महत्वाच्या बातम्या-
मारुती सुझुकी लवकरच बाजारात आणणार नवीन इलेक्ट्रिक OMNI, किंमत असेल फक्त…
सेकंडहॅंड गाडी घ्यायचा विचार करताय? ‘या‘ गोष्टी चेक केल्या तर फसवणूक नाही होणार
रॉयल एनफिल्डची meteor 350 लॉन्च; फीचर्स पाहात तर म्हणाल हीच बाईक घेणार
बॉलीवूडमध्ये स्टार किड्सला लाँच करण्यासाठी करण जोहर घेतो ‘एवढे’ पैसे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.