HRCT स्कोर 21 असतानाही बेडही मिळेना; जवानानं आईवर शेतातच केले उपचार, असा दिला लढा

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे सध्या आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडल्याचे दिसून आले आहे. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना पण बेड मिळत नसल्याचे दिसून आले आहे.

एका सैनिक पुत्राला त्याच्या आईसाठी कोरोना बेड मिळत नव्हता. त्याच्या आईचे वय ६५ वर्ष होते. त्याच्या आईचा कोरोना स्कोअर पण २१ होता पण सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सैनिकाने घरीच त्यांच्यावर उपचार केले आहेत.

सदर घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. ६५ वर्षाचा असणाऱ्या बालिका यादव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा मुलगा रामहरी यादव सुट्टीला गावाला आला होता. तेव्हा त्याला कळले की आईला कोरोना लक्ष दिसून येत आहेत.

त्यांनी त्यांच्या आईचा कोरोना चाचणी करून घेतली. त्यांच्या आईचा एचआरसीटी स्कोअर २१ आला. एचआरसीटी स्कोअर १५ पेक्षा जास्त असेल तर तो घटक समजला जातो. आईचा स्कोअर २१ असताना त्यांना बेड पण मिळाले नाही.

त्यांना बेड न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलाने घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. घरी उपचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी आईला शेतात ठेवले. कळंब येथील एका डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू झाले.

त्यांनी औषधांसोबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला आईला मदत केली. त्यांनी आईला कोमट पाणी, योगासनं करायला मदत केली. आईने त्यानंतर थोड्याच दिवसात कोरोनावर मात केली. त्यांच्या आणि मुलाच्या जिद्दीचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या
बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांनी कधीच केला नाही सावत्र आईचा स्वीकार; एक तर आईला म्हणाली चुडैल

‘इंडिअन आयडल १२ ची संभाव्य विजेती षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने केला संताप व्यक्त; म्हणाली मायकल जाक्सनलाही…..

टॅक्स भरुनही सरकार योग्य त्या सुविधा देत नाही; श्रीमंतांसोबतच मध्यमवर्गीयांची दुसऱ्या देशात जाण्याची तयारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.