ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! ‘ह्या’ तारखेपासून गॅस आणि PNG प्रचंड महागणार

मुंबई। गेल्या काही दिवसांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. दैनंदिन जीवनातील सुविधांच्या किंमतीमध्ये बरीच वाढ होत आहे. अशातच आता 1 ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ होणार आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये सीएनजी आणि पाईप गॅसची (पीएनजी) किंमत 10 ते 11 टक्क्यांनी वाढू शकते. मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात गॅसची किंमत 76 टक्क्यांनी वाढू शकते. देशांतर्गत गॅस धोरणानुसार दर सहा महिन्यांनी नैसर्गिक वायूच्या दरांचा फेरआढावा घेतला जातो.

त्यानुसार आता 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित केले जातील. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन सणासुदीच्या तोंडावर आपले खिसे गॅससाठी खाली करावे लागणार आहेत. सध्या अ‍ॅडमिनिस्टर्ड रेट म्हणजे APM चा दर 1.79 डॉलर्स इतका आहे. मात्र आता हाच दर 1 ऑक्टोबरपासून 3.15 डॉलर्स प्रति मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट इतका होईल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या केजी-डी6 आणि बीपी पीएलसी (BP Plc) खोल समुद्रातील वायू क्षेत्रातून उत्खनन होणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ऑक्टोबरपासून 7.4 एएमबीटीयू इतकी होईल. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने सामान्यांना मोठा दणका बसत आहे.

अशातच बटाटे, नंतर कांदे आणि तेलच्या किंमतीही कडाडल्या आहेत. व आता त्यात घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सामन्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किंमती वाढल्याने खाद्यतेलांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कारवाई केली आहे.

ग्राहक मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवत व्यापाऱ्यांना दर आठवड्याला आपला स्टॉक जाहीर करण्यास सांगितले आहे. आता सरकार कडधान्यांप्रमाणे तेलबियांचा साठा आणि किंमत तपासेल. राज्यांचे पुरवठा अधिकारी स्टॉक तपासतील आणि दराबाबत पुनरावलोकन करतील.

त्यामुळे आता सर्वच खाद्यतेल तसेच नियमित दैनंदिन आवश्यक वस्तूच्या किमती वाढल्याने आता सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या 

अखेर गुपित फुटलेच! मुलांची नाव तैमुर व जहांगीर का ठेवली? करीनाने स्वतःच केला खुलासा… 
जर फक्त धोनीमुळेच जिंकत असतो तर भारताचा ३ वेळा सुपर ८ मध्ये पराभव झाला नसता; पहा आकडेवारी काय म्हणतेय 
त्या रात्री भारतीय खेळाडू रात्री ३ वाजेपर्यंत झोपू शकले नाही; भारतीय खेळाडूंना ट्रोल करणाऱ्यांना दिनेश कार्तिकचे उत्तर 
काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.