तज्ञांनी शोधून काढले कोरोनावर सर्वात प्रभावी औषध, २४ तासात कोरोनाचा होणार खात्मा

कोरोनाच्या महामारीला आता एक वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला पण अजूनही त्याच्यावर प्रभावी असे औषध किंवा लस अजून बाजारात आलेली नाही. एकीकडे सगळे संशोधक कोरोनाच्या लसींवर प्रयोग करून वेगवेगळे दावे करत आहेत आता संशोधकांनी असे औषध शोधले आहे.

कोरोनाचा २४ तासात खात्मा करणारे औषध तज्ञांनी बनवले आहे. तज्ञांचा दावा आहे की हे अँटी व्हायरल औषध कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करून टाकेल. या औषधाचे नाव आहे MK-4482/EIDD-2801 ज्याला सोप्या भाषेत मोल्नूपीराविर असे म्हणतात.

जनरल ऑफ नेचर बायोलॉजीने दिलेल्या वृत्तानुसार मोल्नूपीराविर हे असे औषध आहे ज्याच्याद्वारे आपण कोरोनाला रोखू शकतो. कोरोनासोबत भविष्यात जे नवीन आजार किंवा रोग येतील त्यांच्यावरही हे औषध प्रभावी ठरणार आहे. आणि ही पहिलीच वेळ आहे की कोरोनाला रोखण्यासाठी तोंडातून घेतल्या जाणाऱ्या औषधाचा वापर केला जाणार आहे.

मोल्नूपीराविर हे औषध कोरोनाला रोखण्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या औषधाचा शोध जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका रिसर्च टीमने लावला आहे. सुरुवातीला हे औषध इन्फ्लुएन्झासारख्या घातक फ्लूला रोखण्यासाठी उपयुक्त असल्याचे समजले.

काही जनावरांना पहिल्यांदा कोरोनाचे संक्रमण देण्यात आले आणि नंतर त्यांना हे औषध देण्यात आले. आणि परत त्यांना स्वस्थ जनावरांमध्ये सोडण्यात आले. यानंतर स्वस्थ जनावरांमध्ये कोरोनाचे संक्रमण पसरलेच नाही. त्यामुळे हे औषध कोरोनाचा २४ तासात खात्मा करत असल्याचे समजले आहे असे तज्ञ म्हणाले. याचप्रमाणे जर लोकांना हे औषध दिले तर कोरोनाचे संक्रमण पुढे वाढणार नाही.

महत्वाच्या बातम्या

दिल्लीतील आंदोलन करणारे शेतकरी खरे नाहीत; भाजपच्या केंद्रीय कृषी मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

घटोत्कचला मारणे अशक्य होते पण द्रौपदीच्या ‘या’ एका शापामुळे त्याचा मृत्यू झाला

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.