Share

वैज्ञानिकाच्या घरावर छापा, लाखोंची रोकड आणि सोन्याचे दागिने पाहून अधिकारीही झाले हैराण

मध्य प्रदेशातील सतना येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक सुशील कुमार मिश्रा(Sushil Kumar Mishra) यांच्या घरावर आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सुशील कुमार मिश्रा यांना प्रदूषण नियंत्रण मंडळात ३२ वर्ष काम केले आहे. या ३२ वर्षांच्या नोकरीत त्यांना ६० लाख रुपये पगार मिळाला असता, पण त्यांनी भ्रष्टाचार करत कोट्यवधी रुपये कमावले आहेत.(scientist sushil kumar mishra home raid by EOW officers)

रविवारी आर्थिक गुन्हे कक्षाचे प्रमुख मोहित सक्सेना यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यीय पथकाने सुशील कुमार मिश्रा यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे २८ लाखांची रोकड सापडली आहे. याशिवाय २५ लाखांहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले आहेत.

आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सुशील कुमार मिश्रा यांचे सतना स्मार्ट सिटीला लागून असलेले फार्म हाऊस देखील जप्त केले आहे. आर्थिक गुन्हे कक्षाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सुशील कुमार मिश्रा यांची सुमारे ७ कोटींपेक्षा अधिकची मालमत्ता उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा सध्या आर्थिक गुन्हे कक्षाचे अधिकारी तपास करत आहेत.

या कारवाईसंदर्भात माहिती देताना पोलिस अधीक्षक वीरेंद्र कुमार जैन यांनी सांगितले की, ” सुशील कुमार मिश्रा यांच्या फार्म हाऊससह सुमारे १५ जमिनीची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांच्याकडून ७ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच भोपाळमध्येही प्लॉटची कागदपत्रे सापडली आहेत. याप्रकरणी कारवाई सुरू आहे.”

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वैज्ञानिक सुशील कुमार मिश्रा यांच्या विरोधात काळा पैसा जमा केल्याच्या सतत तक्रारी येत होत्या. यानंतर आर्थिक गुन्हे कक्षाने सुशील कुमार मिश्रा यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आर्थिक गुन्हे कक्षाने सुशील कुमार मिश्रा यांच्या सतना येथील मारुती नगर येथील घरावर छापा टाकला.

सुशील कुमार मिश्रा यांची १९९० मध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर २००६ मध्ये त्यांची केमिस्ट पदावर बढती झाली. २०२० मध्ये त्यांना कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून पुन्हा बढती मिळाली. ३२ वर्षांच्या सेवेत त्यांना पगारातून ६० लाख रुपये मिळाले आहेत. पण आर्थिक गुन्हे कक्षाने केलेल्या कारवाईत त्यांची मालमत्ता ७ कोटींपेक्षा अधिक सापडली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ खास ट्रिक्स वापर अन् तुमच्या स्मार्टफोनमधील इंटरनेट स्पीड वाढावा, जाणून घ्या सेटिंग्सबाबत
शाहरूख खानला अमेरिकेच्या एअरपोर्टवर पुन्हा अडवले? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचे सत्य
शेअर बाजारात गुंतवणूक करत आहात? नुकसान टाळण्यासाठी ‘या’ १० गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now