तुम्ही जास्तीत जास्त किती वर्षे जीवंत राहू शकतात? वैज्ञानिकांनी केला धक्कादायक खुलासा

तुम्ही आतापर्यंत ११४- ११६ वर्षांचे लोक पाहिले असतील, पण त्यापेक्षा जास्त काळ माणूस जीवंत राहू शकत नाही. असे म्हणतात मृत्यु ही अटळ असते, जो माणूस जो जन्म घेतो तो एक दिवस नक्की मरतो.

अशात अनेकांना हा प्रश्न पडतो की माणूस नक्की किती वर्षांपर्यंत जीवंत राहू शकतो. आता या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास वैज्ञानिकांना यश आले आहे. नेचर कम्युनिकेशनच्या रिपोर्टनुसार, माणूस १५० वर्षे जीवंत राहू शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

सिंगापुरच्या वैज्ञानिक माणूस किती वर्ष जगू शकतो, याबाबत संशोधन केले आहे. माणसाचे आयुष्य मोजण्यासाठी सिंगापुरच्या वैज्ञानिकांनी स्पेशल इंडिकेटर्स तयार केले आहे. या इंडिकेटर्सला डायनेमिक ऑर्गेनिझम स्टेट इंडिकेटर म्हटले जाते.

माणसाचे आयुष्य जास्तीत जास्त किती वर्ष असेल, त्यासाठी माणसाच्या रक्ताची आवश्यकता असते. या संशोधनात असे आढळून आले आहे की, माणसाचे आरोग्य चांगले असेल आणि त्याचे शरीर साथ देत असेल, तर माणूस जास्तीत जास्त १५० वर्षे जगू शकतो.

या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या रक्तांचे सॅम्पल घेतले. त्यामध्ये वेगवेगळे निष्कर्ष निघाले आहे. तसेच माणसाला किती तरी आजारांसोबत संघर्ष करावा लागतो हे ही या संशोधनातून समजले आहे. तसेच या संशोधनातून असेही स्पष्ट झाले आहे, की लोकं चांगल्या लाईफ स्टाईलने जगत नाही, त्यामुळे त्यांचे वय कमी होते.

महत्वाच्या बातम्या-

फक्त १२ रनांचा टार्गेट पुर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने खेळल्या होत्या १६ ओव्हर; वाचा त्या ऐतिहासिक मॅचबद्दल
टेलिव्हिजनवरील कलाकारांचे घर फक्त अभिनयाने चालत नाही; म्हणून करतात ‘हे’ काम
वाद-विवादाचे भंडार आदित्य नारायण म्हणण्यास हरकत नाही, जाणून घ्या त्याचे आजवरचे वादविवाद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.