मोदी सरकारचा आदेश झूगारून भाजपच्या ताब्यातील ‘हे’ राज्य सुरू करणार शाळा

 

चंदीगड | सध्या देशात कोरोना संकटाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू होते. आता अनलॉकिंग प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्यावर गेली आहे. तसेच दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या ९० हजारांच्या आसपास गेली आहे.

असे असताना दिल्लीच्या शेजारी असणारे राज्य हरयाणाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरीयानात भाजपची सत्ता आहे. येत्या २७ जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण संचालयाने दिले आहे.

शाळांना उन्हाळ्याची सुट्टी ही १ जुलैपासून सुरू झाली असून ती २६ जुलैला संपणार आहे. या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा सुरू होणार आहेत.

दरम्यान, २७ जुलैपासून शाळा सुरू होणार आहेत, विद्यार्थी आणि पालकांनी तयारी ठेवावी, असे शालेय शिक्षण संचालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

मात्र हरयाणा सरकारचा हा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे, तसेच यामुळे राज्यातील ५२ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.