मोठी बातमी! पहिली ते आठवीची सगळी पोरं पास, परीक्षा होणारच नाही; सरकारची घोषणा

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून वेगवेगळ्या गाईडलाईन्स आखण्यात येत असून राज्य सरकारकडून रोज वेगवेगळे निर्णय घेतले जात आहे. असे असतांना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांमार्फत शिक्षण पोहचावे, त्यांचा अभ्यासक्रमपूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी आपण निर्णय घेतले, आता पहिली ते आठवीच्या पर्यंतच्या संदर्भात महत्वाचा निर्णय घेत येण्यात आहे.

देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांचे वार्षिक मुल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र कोरोनामुळे ते शक्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

तसेच इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय सुद्धा लवकर जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. ही माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.