कोरोना योद्धांच्या मुलांना ‘ही’ युनिव्हर्सिटी देणार स्कॉलरशिप

 

नवी दिल्ली | देशभरात कोरोना संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे संकट रोखण्यासाठी कोरोना योद्धे दिवसरात्र लढा देत आहे.

कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेची सेवा करण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, आरोग्य सेवक, पत्रकार, साफ-सफाई कर्मचारी काम करत आहे. यासाठी आता नोएडा युनिव्हर्सिटीने एक मोठा निर्णय घेतला आहे.

ग्रेटर नोएडा येथील नोएडा युनिव्हर्सिटीने कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ कोरोना योद्धांच्या मुलांना स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक आणि नोएडा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु डॉ. विक्रम सिंग यांनी गुरुवारी याबाबतची घोषणा केली आहे.

कोरोना योद्ध्यांच्या मुलांनी या विद्यापीठात प्रवेश घेतल्यास, त्या मुलांना फी मध्ये २० टक्के सवलत मिळणार आहे. या स्कॉलरशीपमध्ये ट्युशन फी, बोर्डिंग फी आणि इतरही शुल्क सहभागी आहे.

तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच ही स्कॉलरशिप सुरू करण्यात येणार आहे. जो पर्यंत कोरोना योद्धांचे पाल्य या विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तोपर्यंत त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ त्यांना घेता येणार आहे, मात्र त्यासाठी पाल्याला प्रत्येक सेमिस्टरमध्ये ६० टक्के गुण घ्यावे लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.