आकडा टाकायची गरज नाही; राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांसाठी महावितरणने आणली भन्नाट योजना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी धाडसी पाऊल उचलले आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील तब्बल ४.८५ लाख अनधिकृत कृषीपंप वीज जोडण्या अधिकृत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

हा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऊर्जामंत्रीं डॉ राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “येणाऱ्या शिवजयंतीपर्यंत म्हणजेच दि. १९ फेब्रुवारीपर्यंत १० हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. तसेच काही कारणास्तव वीजजोडणीची मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांना महावितरणकडून वीजजोडणी देणे शक्य झाले नव्हते.”

“त्यामुळे वीजचोरी होत होती. आता हे वास्तव लक्षात घेऊन या सुमारे ४.८५ लाख अनधिकृत कृषिपंप वीज जोडण्या अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून येत्या २ महिन्यात सर्वच अनधिकृत कृषिपंप वीजजोडण्या अधिकृत करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत.” असे उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

काल कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० चे लोकार्पण वर्षा येथील समिती कक्षात पार पडले. तसेच याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफीनंतर आता कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीने वीजजोडणी देणे, वीजबिलातील थकबाकीवरील व्याज व विलंब शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सवलतीनंतर पहिल्या वर्षी उर्वरित ५० टक्के थकबाकी भरल्यास राहिलेली बिलाची रक्कम माफ होणार आहे.”

१५ वर्षे जुन्या गाड्या भंगारात जाणार, नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘बाहुबली’ चित्रपटासाठी एस.एस. राजामौलीने घेतले होते प्रभास पेक्षाही जास्त मानधन; आकडा बघून झोप उडेल

२०१९ ची विधानसभा निवडणूक फिक्स होती! काॅंग्रेस, भाजप, शिवसेना तिघांची मिलीभगत झाली उघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.