Share

‘SC-ST, OBC समाजातील लोक उच्च जातीतील लोकांपेक्षा ४ ते ६ वर्षांनी कमी जगतात’; रिपोर्टमधून खुलासा

नुकतंच देशात एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कोणत्या जातीतला माणूस किती वर्ष जगू शकतो? जातीनिहाय लोकांचं आयुष्य किती आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास त्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. उच्च जातीमधील लोक(Open) अनुसूचित जाती जमातींमधील लोकांपेक्षा जास्त जगतात, असं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.(SC-ST, OBC people live 4 to 6 years less than upper caste people)

एससी, एसटी आणि ओबीसी समाजातील लोकांपेक्षा उच्च जातीमधील लोकांचं सरासरी वय चार ते सहा वर्षांनी जास्त आहे, असं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ या संस्थेने हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात जातीनिहाय आयुर्मानबाबत माहिती देण्यात आली आहे. या सर्वेक्षणातील महत्वाची निरीक्षणे लोकसंख्या आणि विकास अहवालात नमूद करण्यात आली आहेत.

या सर्वेक्षणानुसार, अनुसूचित जातीमधील पुरुषांचं वय ४.६ वरून ६.१ पर्यंत वाढलं आहे. उच्च जातीमधील पुरुषांच्या वयात देखील वाढ नोंदवण्यात आली आहे. या सर्वेक्षणात उच्च जातीमधील आणि मुस्लिम पुरुषांच्या आयुर्मानाचा अभ्यास करण्यात आला आहे. उच्च जातीमधील आणि मुस्लिम पुरुषांच्या वयांमधील अंतरात वाढ झाली आहे.

ही वाढ ०.३ वर्षांवरून २.६ वर्षांवरती गेली आहे. उच्च जातीमधील आणि मुस्लिम महिलांमधील वयाच्या अंतरात देखील वाढ नमूद करण्यात आली आहे. ते अंतर २.१ वर्षांवरून २.८ वर्षांवरती गेलं आहे. उच्च जातीमधील आणि इतर म्हणजेच ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम महिलांच्या सरासरी वयातील अंतरात जास्त फरक नाही.

पण उच्च जातीमधील आणि ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम पुरुषांच्या सरासरी वयात जास्त अंतर नोंदवण्यात आलं आहे. उच्च जातीमधील पुरुषांचं वय हे अनुसूचित जाती जमातींमधील पुरुषांच्या वयांपेक्षा ८.४ वर्षांनी अधिक आहे. गेल्या सात वर्षांमध्ये या अंतराचे प्रमाण कमी झालेलं नाही, असं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

१९९७ ते २००० या कालावधीत उच्च जातीमधील महिलांचे सरासरी वय ६४.३ वर्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत उच्च जातीमधील महिलांचे सरासरी वय ७२.२ वर्ष झालं आहे. १९९७ ते २००० या कालावधीत ओबीसी महिलांचे सरासरी वय ६०.७ वर्ष होते. २०१३ ते २०१६ या कालावधीत ओबीसी महिलांचे सरासरी वय ६९.४ वर्ष झालं आहे.

१९९७ ते २००० या कालावधीत उच्च जातीमधील पुरुषांचं सरासरी वय ६२.९ वर्ष होतं. २०१३ ते २०१६ या कालावधीत उच्च जातीमधील पुरुषांचं सरासरी वय ६९.४ वर्ष झालं आहे. १९९७ ते २००० या कालावधीत ओबीसी समाजातील पुरुषांचं सरासरी वय ६०.२ वर्ष होतं. २०१३ ते २०१६ या कालावधीत ओबीसी समाजातील पुरुषांचं सरासरी वय ६६ वर्ष होतं.

महत्वाच्या बातम्या :-
घरात कोल्ड्रींक्सची पेटी आणि धनुष्यबाण ठेवायला सांगताहेत भाजपचे नेते; कारण वाचून धक्का बसेल
भ्रष्टाचार करून स्वतःची, कुटुंबाची मान शरमेने खाली जाईल असे वागू नका; अजितदादांचे पोलीसांना आवाहन
“पोलीस वाचवायला येणार नाहीत, घरात धनुष्यबाण ठेवा”, भाजपच्या खासदाराने सुचवले सुरक्षेचे उपाय

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now