Share

SBI : भारतीय स्टेट बँकेत ३३ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, ‘ही’ आहे शेवटची तारीख

SBI : भारतीय स्टेट बँक (State Bank of India) म्हणजेच एसबीआय (SBI) मध्ये विविध अधिकाऱी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (Specialist Cadre Officer – SCO) या संवर्गात ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.

कोणकोणती पदं आणि किती जागा?

भरतीत खालील तीन पदांसाठी एकूण ३३ रिक्त जागांवर निवड होणार आहे:

  1. जनरल मॅनेजर (IS ऑडिट) – १ जागा

  2. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) – १४ जागा

  3. डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) – १८ जागा

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

जनरल मॅनेजर (General Manager): BE/B.Tech किंवा MCA/M.Tech/M.Sc. या संगणकशास्त्र, IT, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित शाखांमधून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक. तसंच किमान १५ वर्षांचा अनुभव IS ऑडिट क्षेत्रात असावा.

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (Assistant Vice President): BE/B.Tech पदवी किमान ५०% गुणांसह, संगणकशास्त्र, IT, सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखांमधून पूर्ण असावी. किमान ६ वर्षांचा अनुभव आवश्यक.

डिप्युटी मॅनेजर (Deputy Manager): BE/B.Tech पदवी ५०% गुणांसह, IT, सॉफ्टवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखांमधून.
किमान ४ वर्षांचा अनुभव IS ऑडिट क्षेत्रात हवा.

वयोमर्यादा (३० जून २०२५ नुसार):

  • किमान वय: २५ वर्षे

  • कमाल वय: ५५ वर्षे अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट

परीक्षा शुल्क:

  • सामान्य व ओबीसी वर्गासाठी: ₹७५०/-

  • SC/ST/PWD उमेदवारांसाठी: कोणतीही फी नाही

 वेतनश्रेणी (Pay Scale):

₹64,820-2340/1-67,160-2680/10-93,960/- (अनुभव आणि पदावर आधारित अंतिम वेतन निश्चित होईल)

नोकरीचं ठिकाण:

या पदांसाठी मुंबई (Mumbai) आणि हैदराबाद (Hyderabad) येथे नियुक्ती केली जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कोणत्याही इतर स्वरूपातील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रियेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या लिंक:
निवड प्रक्रिया:

लिखित परीक्षा किंवा मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड प्रक्रियेसाठी SBI ने स्वतंत्र वेळापत्रक प्रसिध्द करणे अपेक्षित आहे.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now