SBI ने आणली नवीन योजना; ५ हजार रूपयांपासून करू शकता गुंतवणूक

निवृत्तीनंतर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी नवी योजना आणली आहे. पगार नसलेले लोक आणि निवृत्तीसाठी बचत करण्याची इच्छा असलेले लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळणार असल्याचं स्टेट बॅंक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. ३ फेब्रूवारीपर्यंत ही योजना सूरू राहणार आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना अनेक फायदे मिळणार आहेत.

 

रिटायरमेंट बेनिफिट फंड योजना म्हणजे काय 

या योजनेचं नाव SBI रिटायरमेंट बेनिफिट फंड सोल्युशन ओरिएंटेड स्कीम असं आहे. या योजनेचे व्यवस्थापन दिनेश आहूजा, मोहित जैन, गौरव मेहता हे तिघेजण मिळून करतील. यामध्ये कमीत कमी ५००० रूपयांपासून गुंतवणूक करण्याची सूरूवात करू शकता.

 

गुंतवणूकदारांना काय फायदा होणार

या म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास यामध्ये एफडीपेक्षा जास्त परतावा मिळेल. म्यूचुअल फंडमध्ये वर्षाला १० टक्के परतावा मिळतो. तर एफडीवर फक्त ५ टक्केच परतावा मिळतो. SBI ने दिलेल्या माहितीनूसार या फंडमध्ये चार प्लॅन आहेत त्यात शेअर बाजारावर आधारित, बॉन्सवर आधारित, बॉन्ड्स्वर आधारित, शेअरवर आधारित प्लॅन आहेत. एसबीआय रिटायरमेंट फंडने ग्राहकांसाठी ऑटो ट्रान्स्फर योजना आणि माझी निवड योजना या दोन गुंतवणूकीच्या योजना दिल्या आहेत. या योजनेत गुंतवणूक करून जास्तीत जास्त लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्णब आता पुरता अडकला! बार्कच्या माजी प्रमुखांनी गुन्ह्याची कबुली देत अर्णबलाही अडकवले
शंकरपाळ्या! ‘एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई’ व्हिडीओ पाहून लोटपोट व्हाल
धक्कादायक! सुशांतप्रमाणे गळफास घेऊन आणखी एका अभिनेत्रीने केली आत्म.हत्या, जाताना म्हणाली…
विवाहीत असूनही अरुणा इराणीने आई न होण्याचा निर्णय घेतला होता; कारण ऐकून थक्क व्हाल

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.