आनंदाची बातमी! SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन तुम्ही पण करु शकता हजारोंची कमाई; जाणून घ्या कसे…

भारतीय स्टेट बँकमध्ये जवळपास प्रत्येक माणसाचे खाते असते. ही बँक आपल्याला प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल ऍप्लिकेशन अशा विविध माध्यमांद्वारे सेवा पुरवण्याचे काम करत असते. तसेच सध्या एसबीआय ही बँक देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे.

एसबीआयकडून ग्राहकांना चांगली सेवा दिली जावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता यावे, यासाठी अनेक ठिकाणी बँकेने ग्राहक सेवा केंद्र सुरु केली आहे. या ग्राहक केंद्राच्या माध्यमातून तुम्हाल पैसे जमा करणे, तसेच खाते उघडण्यासारख्या सेवा दिल्या जातात.

ग्रामीण आणि ज्या भागात बँक जवळ नसेल त्या भागात अशाप्रकारची केंद्र खुपच फायदेशीर ठरतात. हे ग्राहक केंद्र कोणीही सुरु करु शकतं. या ग्राहक केंद्रातून तुम्ही चांगली कमाई पण करु शकतात. फक्त हे ग्राहक केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला गरजेचे असणाऱ्या परवानग्या घ्याव्या लागतात.

एसबीआयचे बँकेचे नियम आणि कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर कोणतीही व्यक्ती ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकते. ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला आधी बँकेशी संपर्क साधावा लागतो.

एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात अर्ज सादर करावा लागतो. तसेच या पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमच्या परीसरातील RBO चा पत्ता मिळेल.

तसेच काही खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून एसबीआयचे ग्राहक केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. पण काहीवेळा फसवणूकही केली जाऊ शकते, त्यामुळे बँकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

काळ आला होता पण वेळ नाही! नदीत पिकनीकला गेलेले संपुर्ण कुटुंब अडकले पाण्यात, पण…
‘या’ कारणामुळे मी अक्षय कुमार सोबत काम करू शकत नाही, शाहरुख खानचा मोठा खुलासा
लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.