SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! १ जुलैपासून होणार कॅश विथड्रॉल आणि चेकबुकच्या नियमात बदल; जाणून घ्या…

भारतीय स्टेट बँकच्या ग्राहकांसाठी १ जूलै २०२१ पासून बऱ्याच नियमांमध्ये बदल होणार आहे. या गोष्टींमध्ये बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेकबुक देणे यांचा समावेश आहे.

हा बदल एसबीआयने बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यावर अर्थात बीएसबीडीवर लागू केला आहे. त्यानुसार, एका महिन्यात फक्त ४ व्यवहार विनामुल्य असणार आहे. यामध्ये शाखा आणि एटीएममधून रोख रक्कम काढणे या दोन्ही गोष्टींचा बँकेने समावेश केला आहे.

तसेच शाखा आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी १ जूलै २०२१ पासून पैसे आकारले जाणार आहे. महिन्यातील ४ व्यवहार विनामुल्य असतील, तर त्याचे पुढच्या व्यवहारांसाठी १५ रुपये अधिक जीएसटी आकारला जाणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यासही हेच शुल्क आकारले जाणार आहे.

एसबीआय बीएसबीडी खातेदारांना १० पानी चेकबुकसाठी विनामुल्य परवानगी देण्यात आली आहे. १० पेक्षा अधिक पाने चेकबुक देण्यास आले तर त्यावर अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

१० पेक्षा जास्त पानांच्या चेकबुकसाठी जातील. तसेच आपात्कालीन चेकबुकसाठी ७५ रुपये जीएसटी आणि २५ पृष्ठांसाठी आणि ५० रुपये अधिक जीएसटी आकारला जाणार आहे. तसेच चेकबुकच्या वापर मर्यादेच्या बाबतीत जेष्ठ नागरीकांना सुट देण्यात आली आहे.

बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट हे केवायसीमार्फत उघडता येते. या खात्यामुळे उपलब्ध झालेल्या डेबिट कार्डच्या माध्यमातून आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ४ विथड्रॉल विनामुल्य करु शकाल. या बचत खात्यात वर्षकाठी २.७० टक्के व्याज दिले जाते.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ अधिकाऱ्याच्या बेनामी ३८ कंपन्या, ८२ कोटींची प्रॉपर्टी, कोण आहे हा अधिकारी, वाचा..
शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
प्रेमासाठी कायपण! प्रेमात वेड्या असणाऱ्या प्रियकरानं मागितली भर रस्त्यात प्रियासीकडून किस, व्हिडिओ व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.