“दिलीप कुमारांची प्रकृती नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा”; सायरा बानोंचे भावनिक आवाहन

बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांची तब्येत गेल्या अनेक वर्षांपासून ठिक नाहीये. अशात सायरा बानो गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची देखभाल करत आहे. त्यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत.

सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या तब्येतीबाबत म्हणाल्या, “दिलीप कुमार थकले आहेत. तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी झाली आहे.” एवढंच नाहीतर सायरा बानो यांनी सर्वांना दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “दिलीप साहेब यांची काळजी मी त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी घेते. मी माझ्या कौतुकाची अपेक्षा नाही करत. त्यांना स्पर्श करायला मिळणं हीच माझ्यासाठी सर्वांत आनंदाची गोष्टी आहे. ते माझा श्वास आहेत.”

दिलीप कुमार यांच्या तब्येतीविषयी त्या पुढे म्हणाल्या, “त्यांची प्रकृती फार बरी नाही. अशक्त आहेत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आम्ही देवाचे आभारी आहोत.”

तसेच त्यांचे म्हणणे आहे की, त्या दिलीप कुमार यांची देखभाल कोणत्या दबावालाखाली नाही तर त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून करत आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लग्नाला ५४ वर्ष पूर्ण झाली आहेत.

सलमान खान आणि रवीना टंडन यांच्यात झाले भांडण; कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

मराठी फिल्म इंडस्ट्रीतले हास्य सम्राट अशोक सराफ यांना मामा कोणी बनवले ?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.