लखनऊमधील एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. या महिलेने(Women) आपण माता पार्वतीचा अवतार असल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला महादेवाशी लग्न करायचे आहे, असा महिलेने आग्रह धरला आहे. सध्या ही महिला भारत-चीन सीमेजवळील नाभिडंग येथील प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे वास्तव्यास आहे. (Saying that I am the incarnation of Parvati, the woman reached the Himalayas to marry Mahadev)
या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या महिलेला अटक करण्यासाठी पोलीस नाभिडंग ता ठिकाणी गेले होते. पण महिलेने पोलिसांना आत्महत्येची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांना त्या महिलेला अटक न करताच माघारी परतावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला १५ दिवसांपूर्वी आईसोबत गुंजी या ठिकाणी गेली होती.
पण ही जागा प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे २५ मे नंतर या महिलेला त्या ठिकाणी राहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. पण महिलेने स्वतःला माता पार्वतीचा अवतार असल्याचे सांगितले आणि महादेवाशी लग्न करण्याचा आग्रह धरला. या महिलेने ते ठिकाण सोडण्यास नकार दिला आहे. ही महिला उत्तर प्रदेशातील अलीगंज भागात राहत असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच या महिलेचे नाव हरमिंदर कौर असे आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पिथोरगढचे एसपी लोकेंद्र सिंह यांनी सांगितले की, “या महिलेला प्रतिबंधित क्षेत्रातून काढण्यासाठी आम्ही पोलीस पथकाला पाठवले होते. पण पोलिसांना त्या महिलेने धमकी दिली. त्यामुळे या महिलेला अटक करण्यासाठी आम्ही मोठी टीम धारचुला येथे पाठवली आहे.”
एसपी लोकेंद्र सिंह यांनी पुढे सांगितले की, ” हरमिंदर कौर ही महिला धारचुलाच्या एसडीएमकडून १५ दिवसांची परवानगी घेऊन आईसह गुंजी या ठिकाणी गेली होती. पण मुदत संपल्यानंतर देखील ही महिला प्रतिबंधित क्षेत्र सोडण्यास नकार देत होती. या महिलेला परत आणण्यासाठी दोन उपनिरीक्षक आणि एका निरीक्षकाचा समावेश असलेल्या पथकाला गुंजी येथे पाठवण्यात आलं होत.
गुंजी हे ठिकाण कैलास मानसरोवरच्या जवळ आहे. हरमिंदर कौर ही महिला गेल्या १५ दिवसांपासून त्या ठिकाणी राहत होती. या महिलेने प्रतिबंधित क्षेत्र सोडण्यास पोलिसांना नकार दिला आहे. त्यामुळे आता या महिलेला प्रतिबंधित क्षेत्रातून हटवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. यासाठी पोलीस एक मोठं पथक त्या ठिकाणी पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
महीलेचा पार्वतीचा अवतार असल्याचा दावा, महादेवासोबत लग्न करण्यासाठी उचलले मोठे पाऊल…
तोकडे कपडे घालून सोशल मीडियावर फोटो टाकत असल्याने दोघा भावांनी बहिणीची गळा आवळून केली हत्या
“कोणत्याही प्रश्नावर महाराष्ट्राच्या मागे उभी असणारी केंद्रातील एकमेव व्यक्ती म्हणजे…” पवारांनी सांगीतलं नाव