क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाडवर ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लव्ह

यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने आपल्या दमदार खेळीमुळे क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. मंगळवारी चेन्नई विरुद्ध सनराईझर्स हैद्राबाद असा सामना झाला होता, यावेळी चेन्नईने हैद्राबादचा ७ विकेट्सने पराभव केला आहे.

चेन्नईने मंगळवारी केलेल्या खेळीत पुण्याच्या ऋतूराजचा मोलाचा वाटा होता. ऋतूराजने मॅच जिंकल्यानंतर एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, तो फोटो पाहून आता मराठी अभिनेत्री पण क्लिन बोल्ड झाली आहे.

आयपीएलच्या पहिल्या तीन सामन्यात ऋतूराज अपयशी ठरला होता, पण त्यानंतरच्या सामन्यात त्याने दमदार खेळी खेळली आहे. हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने ४४ बॉलमध्ये ७५ रन बनवले होते. तसेच फाफ ड्यु प्लेसिससोबत १२९ रनांची पार्टनरशिप केली होती. त्यामुळे चेन्नईला १७२ रनांचा टार्गेट पुर्ण करणे सहज शक्य झाले होते.

सामना संपल्यानंतर ऋतूराजने फाफ ड्यु प्लेसिससोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या चेहऱ्यावर मॅच जिंकल्यानंतरचे समाधान आणि स्मित हास्य आहे. या फोटोला मराठी अभिनेत्री सायली संजीवने तिच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन या फोटोवर कमेंट केली आहे.

सायलीने या फोटोवर लव्हची इमोजी टाकली आहे. सायलीच्या या इमोजीमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. ऋतूराजच्या फोटोवर सायली क्लिन बोल्ड झाल्याचीही चर्चा सुरु आहे. तर चाहते सायलीच्या या कमेंटवरुन अनेक तर्क वितर्क लावत आहे.

दरम्यान, चेन्नईची आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सामना होणार आहे. आयपीएलच्या या दोन बलाढ्य टिम असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष या सामन्याकडे लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन
कोरोना लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर काय होईल? वाचा डॉक्टर काय म्हणाले…
मोठी बातमी! अहमदनगरमध्ये बॉम्बस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.