सयाजी शिंदे यांचे आईला अनोखे गिफ्ट; आईच्या वजानाइतक्या बियांची झाडे लावण्याचा केला निर्धार

समाजात पर्यावरणाची काळजी घेणारे फार कमी लोक आहेत. याशिवाय पर्यावरणासाठी चांगले उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करणारे लोकही कमी पाहायला मिळतात. अशात निसर्गाच्या सतत जवळ असणारे अभिनेते सयाजी शिंदे यांनी कौतुकास्पद निर्धार केला आहे. सयाजी शिंदे हे त्यांची आई सुलोचना शिंदे यांच्या वजनाऐवढ्या झाडांच्या बिया महाराष्ट्रभर लावणार आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी शिवजयंती निमित्ताने पन्हाळा, वसंतगड, सदाशिवगड या किल्ल्यांवर शेकडो झाडे लावण्याचा उपक्रम राबवला आहे. यातून सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. झाडांबद्दलचे प्रेम आणि प्रेरणा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या आईकडून मिळाली आहे. याबाबत ते एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखती बोलत होते.

“आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात तू नेहमी माझ्या सोबत असशील” असे आपण आईला सांगितले होते. आईच्या प्रेमासाठी त्यांनी आईला अनोखं गिफ्ट दिले आहे. आईची तुला करून त्यांच्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावल्या. त्यामुळे उगवलेल्या झाडांमध्ये आईचे वास्तव्य आहे असे सयाजी शिंदे यांचे मत आहे.

वृक्षसंवर्धनाची छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली प्रेरणा-
शिवरायांनी त्यांच्या काळात रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावला नव्हता. त्यांना झाडांबद्दल तळमळ होती. आंबा, फणस, सागवान अशी झाडे शिवरायांनी आरमाराच्या प्रयोजनासाठी जगवली होती. ही झाडे तोडू नये यासाठी आज्ञापत्र काढले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेल्या आज्ञापत्रानुसार, रयतेने या झाडांना लेकरासारखं जगवलं आहे. त्यामुळे ही झाडं तोडू नये. केवळ जिर्ण झाडं तोडायला परवानगी आहे. ही परवानगी त्या झाडांच्या मालकानं द्यायला हवी. त्यासाठी झाड मालकाला योग्य ती रक्कम देण्यात यावी. असा महाराजांचा आदेश होता. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळाल्याचे सयाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
कचरा गोळा करणाऱ्या दोन भावंडांचं टॅलेंट पाहून भारावले महिंद्रा; पहा व्हिडीओ
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल; वाचा नेमकं काय त्या मेसेजमध्ये
मुंबईत खासदाराची आत्महत्या, सुसाईट नोटमध्ये धक्कादायक माहिती
पवार, फडणवीसांच्या उपस्थीतीत भाजप नेत्याच्या मुलाचा शाही विवाह? सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.