Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे एक प्रसिद्ध अभिनेते आहे. कला क्षेत्रासोबत सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. मराठी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी यांसारख्या विविध भाषांतील चित्रपटांमध्ये त्यांनी कामे केली आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत तर त्यांनी ‘एक से बडकर’ एक भूमिका केल्या आहेत. आपल्या कामासोबत सामाजिक जबाबदारीचे देखील भान असणारे सयाजी शिंदे ( Sayaji Shinde) कमालीचे संवेदनशील अभिनेते म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या आईसोबतचा एक किस्सा सांगितला आहे.
एकदा सयाजी शिंदे व त्यांची आई पुणे ते सातारा सोबत प्रवास करत होते. त्यावेळेचा हा किस्सा आहे. यावेळी सयाजी शिंदे आपले एक तासाचे शूटिंग संपवून आईसोबत साताऱ्याला निघाले. जात असताना त्यांनी त्यांच्याजवळ असणारे पैसे सीटवर ठेवले. त्यावर आई म्हणाली हे काय ?
सयाजी शिंदे यांनी ते पैसे असल्याचे सांगितले. यानंतर आईने लगेच विचारले की, हे कुठून आणले ? यावर उत्तर देत सयाजी शिंदे यांनी आता आपण ज्या शूटिंग साठी गेलो होतो, त्या शूटिंगचे हे पैसे आहेत, असे सांगितले. आईने परत एकदा शिंदेंना किती पैसे आहेत ? असा प्रश्न विचारला.
दरम्यान सयाजी शिंदे यांनी ते एक लाख रुपये असल्याची माहिती दिली. यावेळी आश्चर्यचकित होत आई त्यांना म्हणाली की, एवढे पैसे कशाला? यावर सयाजी शिंदे म्हणाले की, “मला हे पैसे कामाचे भेटले आहेत.” यावर त्यांच्या आईने दिलेली प्रतिक्रिया वाचून तुम्हीही थक्क व्हाल.
अगदी एक तासासाठी आपल्या मुलाला एवढे पैसे भेटले आहे हे समजताच ती माऊली म्हणाली की, “एवढ्या कमी वेळेसाठी एवढे पैसे दिले. त्यांना अक्कल नाही. पण तुला पण अक्कल नाही का? एवढे पैसे का घेतलेस?”. यावरूनच सयाजी शिंदे यांच्या आईचा साधेपणा दिसून येतो. कदाचित यामुळेच सयाजी शिंदे यांच्यात देखील साधेपणा पहायला मिळतो.
महत्वाच्या बातम्या
उर्फी जावेदसारख्याच एका मॉडेलचा चित्रा वाघ यांच्याकडून सत्कार, सोशल मिडीयावर फोटो व्हायरल
उर्फी जावेद- चित्रा वाघ वादाबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, म्हणाले…