मुंबई | भंडारा जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. यामध्ये १० नवजात शिशूंचा मृत्यू झाला.
मात्र, यादरम्यान नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिका सविता इखार यांची आठवण झाली. याचे कारण असे की, २०१९ मध्ये लागलेल्या आगीत त्यांनी एकावेळी चार बालक, तर दुसऱ्यावेळी पाच बालकांना हातावर घेत, तब्बल ९ नवजात शिशूंचा जीव वाचविला होता.
त्याही दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील येथे एनआयसीयूला आग लागली होती. तेव्हा ड्युटीवर अधिपरिचारिका सविता इखार या होत्या. साधारण पहाटे पावणेतीनची वेळ होती. तीन-तीन तासांनी बालकांना फिडींग करावे लागते.
आणि नेहमीप्रमाणे सविता या बाहेरच्या कॉरीडोअरमध्ये आल्या. एनआयसीयूच्या प्रवेशद्वाराजवळ डीपी होती. त्याठिकाणी स्पार्कींग होताना त्यांना दिसले. मात्र, ते थोड्या वेळाने थांबेल म्हणून त्या त्याच ठिकाणी थांबून वाट पाहिली. पण, विद्युत पुरवठा सुरू असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केले. तिथेच खाली ऑक्सिजनचे जम्बो सिलिडर ठेवले होते.
त्यावेळी सविता यांनी बाहेर धाव घेतली. मात्र, पहाटेची वेळ असल्याने कोणीच नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या वार्डातील एक परिचारिका तेथे आली. सविता यांनी तिला आग लागली हे सांगितले अन् एनआयसीयूकडे धाव घेतली. सर्व ऑक्सिजन सिलिंडर बंद केले.
बाळाला टॅगिंग करून एका हातावर चार बालकांना ठेवत बाहेर धाव घेतली. दुसऱ्या वार्डात ठेवले. पाचही जणांना एकावेळी उचलले आणि दुसऱ्या वार्डात ठेवले. सविता यांनी दाखविलेली समयसूचकता आणि धाडसामुळे त्या नऊही नवजात बालकांना सुखरूप वाचवण्यात त्यांना यश आले.
महत्त्वाच्या बातम्या
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’
भंडारा : …तर दुर्घटना घडली नसती; RTIच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
‘बर्ड फ्लू’ अलर्ट! चिकन व अंडी खाणाऱ्यांनी वेळीच व्हा सावध; WHOने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला