‘सहकारी बँकांना वाचवा’! शरद पवारांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून विनंती

मुंबई । १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या, मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले, तर सहकारी बँकांना आर्थिक शिस्तीची गरज असल्याचेही म्हटले.

परंतु सरकारी बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेचा प्रभाव वाढत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे.

सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सहमत असतील असे ते म्हणाले. तसेच सहकारी बँकांनी देशात साक्षरता वाढवण्याची महत्त्वाची भूमिकाही साकारली असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचे सहकारपण कायम ठेवले पाहिजे.

यामुळे शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसेच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपला हेतू यशस्वी होईल, असे शरद पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.