बाॅलीवूडमधील ‘ह्या’ आठ दहशतवाद्यांपासून बाॅलीवूडला वाचवायचय – कंगणा राणौत

मुलुखमैदान: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चर्चेचा विषय बनत आहे. वेगवेगळ्या विषयांवर ती ट्विट करत असते. असेच ट्विट कंगणाने शनिवारी केले आहे. विविध दहशतवाद्यांपासून चित्रपटसृष्टी  वाचविणे आवश्यक आहे. असे कंगनाने ट्विट केले आहे.

कंगनाने शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला चित्रपटसृष्टीला विविध दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याची गरज आहे. यामध्ये कंगणाने ८ दहशतवाद लिहले आहेत.

या ट्विटमध्ये कंगणाने नेपोटिझम दहशतवाद, ड्रग माफिया दहशतवाद, लैंगिकतावाद दहशतवाद, धार्मिक आणि प्रादेशिक दहशतवाद, विदेशी चित्रपट दहशतवाद, चाचेगिरी दहशतवाद, कामगारांचा शोषण दहशतवाद, प्रतिभा शोषण दहशतवाद या दहशतवादांपासून चित्रपटसृष्टीला वाचविण्याचे आहे असे लिहले आहे.

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच फिल्म सिटी बनवण्याच्या घोषणेबद्दल कंगनाने यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांचेही आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.