‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर काढण्याची मागणी, षण्मुखप्रियासाठी दाक्षिणात्य इंडस्ट्री मैदानात

सोनी टीव्हीच्या सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडल १२ ‘ ची स्पर्धक षण्मुख प्रिया या स्पर्धेची संभाव्य  विजेती म्हणून पाहिली जात आहे. तिने आपल्या तेजस्वी आवाजाने आणि सुरांनी न्यायाधीश आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान बनवले आहे. आपल्या योडेलिंग कौशल्यासाठी परिचित असलेल्या या १८ वर्षीय षण्मुख प्रियाचे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतील.

षण्मुख प्रिया गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोल होताना पाहायला मिळते. परंतु आता षण्मुख प्रियाच्या पाठीशी साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सहकार्य लाभले आहे. काल रात्री ‘सिमा’ अर्थात दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वतीने एक ट्विट केले गेले. या ट्विटमध्ये षण्मुखप्रिया हिला SIIMAने पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

SIIMA ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘विशाखापट्टणममधील षण्मुखप्रिया ही एक अशी प्रतिभा आहे, जी यावर्षीच्या इंडियन आयडॉलमधील सेन्शेशनपेक्षा कमी नाही’. दुसर्‍या ट्वीटमध्ये, सीआयएमएने लिहिले की, १८ वर्षांची ही मुलगी तिच्या शानदार गायनामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यास सक्षम आहे. म्हणूनच, या हंगामात आयडॉल १२ स्पर्धेच्या शर्यतीमध्ये संभाव्य विजेती म्हणून षण्मुखप्रियाचे नाव पुढे येत आहे.

किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये अनेक गोष्टीना घेऊन ट्रोल करण्यात आले होते. त्याच वेळी इंडियन आयडॉलच्या चाहत्यांनी षण्मुखप्रियालाही बरेच ट्रोल केले होते. तरीही षण्मुखप्रियाने या टिकाकडे दुर्लक्ष करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. अश्यातच एसआयआयएमए ने षण्मुखप्रिया हिला दिलेला हा पाठिंबा निश्चितच तिचे मनोबल वाढवण्यात मदत होईल.

एसआयआयएमए (SIIMA) ही दक्षिणची एक मोठी संस्था आहे, ज्यांचे पुरस्कार तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि संपूर्ण दक्षिण भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करतात. जरी षण्मुखप्रियाला दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडून पाठिंबा मिळत असला तरी तिला शोमधून काढण्याची मागणी देखील वाढत आहे.

एवढ्यातच झालेल्या एका मुलाखतीत षण्मुख प्रियाने म्हटले आहे की, मायकेल जॅक्सनसारख्या दिग्गज कलाकारांनाही टीकेचा सामना करावा लागला. मी त्याच्या समोर एक छोटी कलाकार आहे. मला फक्त माझे संगीत मह्त्त्वाचे आहे.

हे ही वाचा-

‘सुंदरा मनामध्ये भरली’, मालिकेतील अभिनेत्री अक्षया नाईकचा ग्लॅमरस अवतार पाहिलात? पहा फोटो

VIDEO: सेल्फीसाठी मिलिंद सोमनने महिलेला भररस्त्यात करायला लावले असे काही की, महिला झाली घामाघुम

कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात उद्धव ठाकरे नंबर वन! जाणून घ्या कोणाचा कितवा नंबर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.