दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री का करत नाही मेकअप? कारण जाणून घ्या 

दक्षिणात्य भारतीय चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि साधेपणाने देशभरातील लोकांच्या हृदयात स्वत: साठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज तिचा 29 वा वाढदिवस आहे त्यानिमित्त देशभरातील अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ती तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये बनलेल्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

साईने २०१५ मध्ये रिलीज झालेल्या प्रेमकम या चित्रपटापासून मुख्य अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. सर्वांना खूप प्रभावित करणारी साई पल्लवीची एक गोष्ट म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या सिनेमांमध्ये ती अगदी साधी आणि मेकअप न करता दिसून येते. बर्‍याच वेळा या गोष्टींचे लोकांना आश्चर्य वाटते.

सध्याच्या काळात मुलींमध्ये एकमेकांपेक्षा सुंदर दिसण्याची जणू स्पर्धा चालू आहे. अश्या काळात साई बहुतेक वेळा सिम्पल दिसून येते. साई आपल्या चित्रपटात खूपच कमी मेकअप करते. बर्‍याच चित्रपटांमध्ये ती मेकअपविना दिसते. पण अगदी कमी लोकांना माहितीये की ती चित्रपटात आपला लूक इतका साधा का ठेवते.

सई पल्लवी यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘प्रेमाम’ चित्रपटाचे दिग्दर्शक अल्फन्स पुथ्रेन यांनी त्यांना चित्रपटात मेकअपशिवाय दिसण्यासाठी प्रोत्साहित केले होते. साईने त्यांच्यानंतर ज्या दिग्दर्शकांसोबत काम केले त्यांच्यापैकी बहुतेक दिग्दर्शकांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात खूप मदत केली. साई म्हणते की ती चित्रपटात मेकअप न करता स्वत: सारख्या सर्व मुलींचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करते.

विशेष म्हणजे साई पल्लवीला जेव्हा फेअरनेस क्रीमची जाहिरात मिळाली तेव्हा ती चर्चेत आली होती, त्यासाठी तिला दोन कोटी रुपये फी दिली जात होती. मात्र, साईंनी त्या करण्यास नकार दिला. ती म्हणाली की अशा जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैसे घेण्यापेक्षा ‘मी घरी जाऊन तीन रोटी खाईन आणि भात खाईन. माझ्या गरजा खूप कमी आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे साई एक यशस्वी अभिनेत्री होण्याव्यतिरिक्त डॉक्टर देखील आहे. त्यांनी जॉर्जियाच्या टिबिलिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस पदवी घेतली आहे. साई दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते.

हे ही वाचा-

..आणि पोलिसांनी शटर उघडून दुकान चालवणाऱ्या मुलाला लावल्या कानशिलात, पहा व्हिडीओ

कपिल शर्मा संपत्तीच्या बाबतीत बॉलीवूड कलाकारांना टाकतो मागे; जाणून घ्या एकूण आकडा

अभिनेता राहूल व्होराचे ३५ व्या वर्षी कोरोनाने निधन; शेवटपर्यंत फेसबूकवरून मागत होता मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.