कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर BCCI चा दबाव? गांगुलीने केलेल्या खुलाश्यातून सत्य आले बाहेर

विराट कोहलीने कर्णधारपद सोडताच गांगुलीला बसला होता धक्का, म्हणाला…

बीबीसीआयने विराटवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकला होता?; सौरव गांगुलीने केला मोठा खुलासा

१६ सप्टेंबरला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी २० चं कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. टी-२० विश्वचषकानंतर तो कर्णधारपद सोडणार असल्याची माहिती त्याने दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली होती.

विराटच्या अशा निर्णयामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अशातच एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. यानंतर बीसीसीआयने विराटवर दबाव टाकल्या असल्याची चर्चा रंगल होती. आता या प्रकरणावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सौरव गांगुली म्हणाले की, या विश्वचषकानंतर टी२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीचा होता आणि बोर्डाने त्याच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. सौरव गांगुली यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत सांगितले आहे.

मला याचे आश्चर्य वाटले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर त्याने हा निर्णय घेतला असावा. तो त्याचा निर्णय होता. आम्ही ना त्याच्याशी बोललो ना त्याच्यावर दबाव आणला. आम्ही कोणावर दबाव आणत नाही. मी देखील एक खेळाडू आहे आणि असे काही करणार नाही, असे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

२०१७ ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, २०१९ वर्ल्ड कपची सेमीफायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१ ची फायनल हे तीन मोठे प्रसंग होते जेव्हा टीम इंडियाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आयसीसी टूर्नामेंट गमावले. या अर्थाने, यूएई-ओमानमध्ये रिलीज झालेल्या वर्ल्ड टी -२० ची ही सातवी आवृत्ती कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरू शकते. त्यामुळे संघालाही विराटला ही ट्रॉफी जिंकून द्यायला आवडेल, असे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे.

२००३ च्या विश्वचषकात भारताला अंतिम फेरीत नेणारा सौरव गांगुली म्हणाले, आता खुप क्रिकेट खेळले जाते आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद इतके दिवस सोपे नाही. मी सुद्धा पाच वर्षे कर्णधार होतो. कर्णधारपदामुळे खूप प्रसिद्धी आणि आदर मिळतो पण खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही थकतात. हे गांगुली, धोनी किंवा विराटबद्दल नाही. भावी कर्णधारांनाही दडपण जाणवेल. हे सोपे काम नाही.

महत्वाच्या बातम्या-
“माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे”
अरे बापरे! १७ वर्षाच्या मुलाला मोबईलचं वेड, २ लाखात बायकोला विकून घेतला महागडा मोबाईल
‘शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला, तर ड्रग्सची पिठी साखर होईल’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.