चिंताजनक! सौरव गांगुलींची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल

भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. गांगुली यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने पुन्हा एकदा कोलकातामधील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यानंतर गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती ठिक असल्याने ७ जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आले होते.

तीन आठवड्याच्या आतच गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी छाती दुखण्याचा त्रास त्यांना जाणवत होता. त्यानंतर गांगुलीला कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मागच्यावेळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गांगुली यांनी संवाद साधला. ‘हा आयुष्याचाच एक भाग आहे. गोष्टी घडतच राहतात. पण, आता मी पूर्णपणे बरा आहे. किंबहुना येत्या काही दिवसांमध्येच या परिस्थितीवर माझं शरीर कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहत मी कामाला सुरुवात करणार आहे’, असे सौरव गांगुली यांनी म्हटले होते.

‘तीरा’च्या इंजक्शनसाठी सोळा कोटी रुपये जमले पण आता सरकारकडून हवीय ‘ही’ मदत

सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार; मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती..

जंगलात मिळाली सगळ्यात दुर्मिळ मांजर, एक डोळा निळा तर एक पिवळा; किंमत वाचून अवाक व्हाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.