आजुबाजुचे कोरोना पॉझिटिव्ह आले किंवा सर्दी खोकला झाला की आपण कोरोना टेस्ट करून घेतो. कोणत्याही माणसाने २ किंवा जास्तीत जास्त ३ वेळा कोरोना चाचणी केली असेल. पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गेल्या ४-५ महिन्यांमध्ये किती कोरोनाच्या चाचण्या केल्या, याचा आकडा सांगितला तर तुम्हाला धक्का बसेल.
व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना गांगुली म्हणाला की, गेल्या साडेचार महिन्यात मी २२ वेळा कोरोनाच्या चाचण्या केल्या आहेत. यामध्ये एकदाही पॉझिटिव्ह आलो नाही. माझ्या संपर्कातील असणारे लोक पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मला कोरोना चाचण्या कराव्या लागल्या होत्या. पण मला मात्र करोना झाला नसल्याचेच चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.”
पुढे गांगुलीने सांगितले की, “घरांमध्ये वृद्ध आई-बाबा आहेत. तसेच मी दुबईलाही गेलो होतो. सुरुवातीला मी चिंतेत होतो. स्वत:साठी नाही तर समाजासाठी, कारण माझ्यामुळे कोणाला कोरोना होऊ नये ही भावना नेहमी मनात असायची. त्यामुळे एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे समजल्यानंतर मी तत्काळ करोना चाचणी करत होतो”.
कोरोनाच्या काळात गांगुली आयपीएलचे आयोजन करण्यासाठी झटत होता. गांगुलीने पुढाकार घेऊन यावर्षीचे आयपीएल युएईतही यशस्वी करून दाखवले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे जवळपास पाच महिन्यांपासून आयपीएलच्या आयोजनासाठी फिरत होते. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांमध्ये त्यांना बऱ्याच कोरोना चाचण्या कराव्या लागल्या.
जिगरी दोस्त राजेश खन्ना आणि यश चोप्राची मैत्री तुटण्यामागे आहे ‘हे’ कारण
कसाबसमोर असून पण घाबरला नव्हता हा ‘छोटू चायवाला’; नजरेला नजर भिडवत वाचवले अनेकांचे जीव