सौरभ गांगुलीच्या पत्नीने दिली पोलीसांत तक्रार; पुर्ण प्रकरण जाणून घ्या

सुप्रसिद्ध लोक आणि त्यांच्या सहवासातील लोकांना प्रसिद्धी सोबतच अनेक त्रासांना तोंड द्यावे लागते. अशाच एका त्रासाचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्या पत्नी डोना याना करावा लागला.

डोना गांगुली आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स लाइमलाईट पासून दूर राहणे पसंद करतात. डोना गांगुली प्रसिद्ध ओडिषा डान्सर आहेत. सौरभ गांगुली यांची मुलगी सना देखील आईप्रमाणे डान्सर आहे.

सौरभ गांगुली यांच्या पत्नी डोना यांनी आपल्या नावे बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी अनोळखी व्यक्ती बद्दल पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले कि माझ्या नावाचा तसेच सौरभ आणि माझ्या सोबतच्या फोटोचा वापर करून त्या व्यक्तीने बनावट फेसबुक पेज तयार केले आहे.

बनावट फेसबुक पेज बद्दलची माहिती त्यांना त्यांच्या एका विद्यार्थीनीने दिली. या पुढे जाऊन त्या बोलतात कि आमच्या दोघांचा फोटो वापरला याविषयी माझा कोणताही प्रश्न नाही पण काही वेळा लोक वेगवेगळी मत मांडतात त्यामुळे गैरसमज निर्माण होता. मला अशा आहे कि पोलीस हे प्रकरण लवकरच मिटवतील.

पोलिसांनी दिलेली प्रतिक्रिया –
दिलेल्या तक्रारींवर पोलिसांनी प्रतिक्रिया देत म्हणाले कि,बनावटी फेसबुक पेज बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयपी ऍड्रेसची ओळख झाली आहे, लवकरात लवकर आम्ही त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करू.

सौरभ गांगुली यांच्या पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सना गांगुली उत्तम क्लासिकल डान्सर आहेत. सदर बनावट फेसबुक पेज वरून डोना यांच्यासह त्यांनी मुलगी सना हिचे देखील फोटो शेअर करण्यात आले होते. या बनावट पेजचे तब्बल ७०,००० फॉलोअर होते.

महत्वाच्या बातम्या
मी माझ्या बापाला सुनावले होते, की मी तुमच्या कानाखाली वाजवेल; कंगनाने सांगितला ‘तो’ किस्सा
अखेर मुंबई इंडियन्सने सांगितले अर्जून तेंडुलकरच्या निवडीमागचे खरे कारण; वाचा..
आज काँग्रेसची खासदार असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीसोबत जोडले जात होते सौरभ गांगुलीचे नाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.