एकीकडे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी जोरात केली आहे. तर दुसरीकडे नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ.सुधीर तांबे यांना काँग्रेसचे तिकीट देण्यात आले, मात्र त्यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. ते म्हणाले की मी कॉंग्रेसचाच उमेदवार आहे. पण मी सर्व राजकीय पक्षांकडे पाठींबा मागणार आहे.
मात्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना चांगलाच दणका दिला आहे. ते म्हणाले की सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला कॉंग्रेसचा पाठींबा नाही. त्यांना कॉंग्रेस कुठलीही मदत करणार नाही. हायकमांडच्या निर्देशानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ते काॅंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजीत यांचे वडील सुधीर तांबे हे पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करतात का हे पहावे लागेल. तसेच कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात हे देखील पहाने महत्वाचे ठरेल. अजूनतरी बाळासाहेब थोरात यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर म्हणजेच एकूण पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये नाशिक विभाग पदवीधर जागा, अमरावती पदवीधर जागा, औरंगाबाद विभाग शिक्षक जागा, कोकण विभाग शिक्षक जागा आणि नागपूर शिक्षक जागा यांचा समावेश आहे.
या जागांवर विद्यमान विधान परीषदेचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे ३० जानेवारी रोजी एमएलसी निवडणुका होत आहेत. २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मविआ विरोधात भाजप अशा लढतीत कोण बाजी मारेल हे दोन फेब्रुवारीला समोर येईल. शिंदे गट एकाही जागेवर निवडणूक लढवत नाही.
महत्वाच्या बातम्या
मराठमोळ्या क्रिकेटपटूचा रुद्रावतार! एकाच ओव्हरमध्ये ठोकले ७ सिक्स; द्विशतक झळकावत केला विश्वविक्रम
चहलने हॅंट्रिक घेताच स्टॅंडमध्ये धनश्री आनंदाने मारू लागली उड्या, व्हिडीओ होतोय व्हायरल