कोल्हापूरकरांचा नाद खुळा! एकाच मंडपात ‘शुभ मंगल सावधान आणि कबूल है’ म्हणत विवाहसोहळा संपन्न

 

कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत कोल्हापूरातील लोक जातीभेद, धर्मभेद मानत नाही, हे अनेकदा दिसून आले आहे, असेच एक उदाहरण आता पुन्हा एकदा समोर आले आहे.

आता कोल्हापूरात एका हिंदू मुलाने आणि मुस्लिम मुलीने एकत्र येऊन विवाह केला आहे. लग्न मंडपात एकाच ठिकाणी शुभ मंगल सावधानासोबत तीन वेळा कबूल है, कबूल है, कबूल है, हे सुद्धा ऐकायला मिळाले आहे.

रंकाळा परिसरातील राहणाऱ्या सत्यजित संजय जाधव आणि मारशा नदीम मुजावर यांनी हा विवाह केला आहे. या विवाहमध्ये मुलगा हिंदू धर्माचा आहे तर मुलगी मुस्लिम धर्माची आहे.

हे दोघेही उच्चशिक्षित आहेत, तसेच दोघेही पुरोगामी विचारांचे आहे. हे दोघेही १० ते १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, दोघांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्याने लग्नाला सुद्धा झटपट परवानगी मिळाली.

१९ मार्चला एका हॉटेलमध्ये मौलवींच्या उपस्थित मुस्लिम धर्माच्या पद्धतीने हा निकाह पार पडल्यानंतर ,लगेच हिंदू धर्माप्रमाणे तिथे अक्षदा पडल्या आणि सप्तपदी झाली. त्यामुळे दोन्ही कुटुंबातील मैत्रीचे संबंध आता नात्यात बदलले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.