Share

गप्प बसलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी.., मोदी सरकारबाबत मलिकांचा खळबळजनक खुलासा

narendra-modi.j

गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मग तो काश्मीर प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांची समस्या असो. भाजप सरकारने आपल्याला अध्यक्षपदाचं आमिष दाखवलं, असं म्हणत मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.

हरियाणाच्या जिंदमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना मलिक यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला. तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

याचबरोबर मलिक यांनी राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आपण स्वतः देशाचा दौरा करणार असून शेतकऱ्यांना एकत्र आणणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच मलिक यांनी सत्ता परिवर्तनासाठी एकत्र येऊन शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पुन्हा एकदा मलिक आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढे बोलताना मलिक यांनी मोदी सरकार बद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपमधील अनेक नेत्यांच्या भुवया उंचवल्या आहेत. याबाबत बोलताना मलिक म्हणाले, “मला सांगण्यात आलं होतं की, जर तुम्ही गप्प बसलात, तर तुम्हाला अध्यक्ष बनवलं जाईल,” असे मलिक यांनी सांगितले.

तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने न बोलल्यास त्यांना राष्ट्रपतीपदी बढती दिली जाईल, असे भाजपामधील त्यांच्या काही मित्रांनी सांगितल्याचा दावाही मलिक यांनी केला. तसेच पुढे बोलताना मलिक म्हणाले, त्याने प्रत्येक मार्गाने आपल्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

परंतु, मी त्यांच्या सर्व ऑफर नाकारल्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो. कारण राज्यपाल आणि राष्ट्रपती ही पदे माझ्यासाठी काहीच नाहीत, असे मलिक बोलले. दरम्यान मलिक यांनी केंद्र सरकारवर केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
चुकीला माफी नाही! शिवसेनेच्या बड्या नेत्यावर मुख्यमंत्री करणार कारवाई, पक्षातून होऊ शकते हकालपट्टी
क्रिकेटर्स माझ्याकडे टक लावू बघायचे, माझा अपमान करायचे, मंदिराने सांगितला भितीदायक अनुभव
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर
सुरुवातीला येड्यात काढले आणि आता डोक्यावर घेऊन नाचतय अख्खं गाव, वाचा शेतकऱ्याने केलेली कमाल

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now