satish ghate enter in bjp with devendra fadanvis |राज्यात सध्या भाजप आणि शिदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसून येत आहे. अशात एका नेत्याला शिंदे गटाची ऑफऱ आली होती. पण त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सतीश घाटगे असे त्या नेत्याचे नाव आहे. सतीश घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे जालन्याच्या राजकारणात तगड्या उमेदवाराची भर पडणार आहे. घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि शिवसेनेचे हिमकट उढाण यांच्यासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तसेच परभणीतून लोकसभेची उमेदवारीही सतीश घाटगे यांना दिली जाऊ शकते. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही खेळी केल्याचे म्हटले जात आहे. सतीश घाटगे हे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आहे.
अशात घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे परभणी लोकसभा आणि जालन्यातील विधानसभा निवडणूकीत भाजपला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. देवेंद्र फडणवीसांना सतीश घाटगे यांना भाजपात प्रवेश देऊन मतदार संघात मोठी ताकद उभी केली आहे.
घनसांगवी हा मतदार संघ जालना जिल्ह्यात आहे, पण लोकसभेसाठी तो परभणीत जोडला गेला आहे. सतीश घाटगे हे दोन साखरकारखान्याचे चेअरमन आहे. अशात घाटगे यांच्या प्रवेशाने भाजपची या मतदार संघातील ताकद वाढली आहे.
घाटगे आपल्या पक्षात यावे यासाठी शिंदे गटाकडूनही भरपुर प्रयत्न केले गेले. शिंदे गटाच्या काही नेत्यांनी घाटगे यांना आपल्या पक्षात येण्यासाठी जाहीर आमंत्रणही दिलं होतं. असे असले तरी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फडणवीसांना विधानसभा आणि लोकसभा मतदार संघात मोठी ताकद निर्माण करण्यासाठी शिंदे गटाला हा मोठा धक्का दिल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
raj thackeray : माध्यमांसमोर गरळ ओकायची असेल तर आधी राजीनामा द्या; राज ठाकरे आपल्याच नेत्यांवर संतापले
shahrukh khan : शाहरुखची कातडी सोलून त्याला जिवंत जाळणार अन् सलमान-आमिरला फासावर चढवणार
NCP : राष्ट्रवादीचा ठाकरेंच्या शिवसेनेला धोका; शिंदे गटातील बड्या मंत्र्याच्या मुलीला बनवलं सरपंच