मराठवाड्यानेही भाजपला डावललं; सतीश चव्हाणांची तिसऱ्यांदा विजयाची हॅटट्रिक

मुंबई | मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं असे मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केले.

पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण ११६६६८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण ५७८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

चव्हाण यांनी भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यावर तब्बल ५७८९५ मतांची विक्रमी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. निवडणूक चुरसीची होईल असे वाटतांना सतीश चव्हाण यांच्या आघाडीत प्रत्येक फेरीला वाढच होत गेल्याने ही लढत एकतर्फी बनली. आणि सतीश चव्हाणांचा दणदणीत विजय झाला.

दरम्यान, पुणे पदवीधर हा भाजपचा हक्काचा असणारा मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटला आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मते टाकून भाजपाच्या गडाला मोठे खिंडार पाडले आहे.

तर दुसरीकडे नागपूर हा भाजपाचा गड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, काँग्रेसने या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
भाजपाच्या गडाला २० वर्षांनी खिंडार; अरुण लाड यांचा विक्रमी मतांनी विजय
पुणे पदवीधरमध्ये भाजपला भगदाड; चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी जोरात
रेखा जरे हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटलांचे प्रचंड धक्कादायक खुलासे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.