काय सांगता! पंतप्रधान मोदींचा फोटो आणि भगवद्गीतेची प्रत अंतराळात पाठवणार

मुंबई | अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाकडून यापूर्वी अनेकदा लोकप्रिय व्यक्तींच्या नावांची यादी अंतराळात पाठवण्यात आली आहे. हा ट्रेण्ड आता भारताकडूनही फॉलो केला जाणार आहे.खासगी क्षेत्रातील पहिला उपग्रह सतीश धवन सॅटलाइटसोबत भगवद्गीता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि २५ हजार भारतीय लोकांची नावं अंतराळात पाठवली जाणार आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्था (इस्रो) सर्वाधिक विश्वसनीय असलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाने म्हणजेच पीएसएलव्ही सी-५१ ने इतर दोन खासगी उपग्रहांसोबत सएडी सॅट अवकाशात सोडणार आहे.

तसेच एसडी सॅटची निर्मिती करणाऱ्या चेन्नईमधील स्पेसकिड्स या कंपनीचे तांत्रिक विभागाचे प्रमुख असणाऱ्या रिफत शाहरुख यांनी म्हंटले आहे की, ‘साडेतीन किलो वजनाच्या या नॅनो उपग्रहामध्ये एक अतिरिक्त चिप लावण्यात आली असून त्यामध्येच ही नावं असणार आहे. या नॅनोसॅटेलाइटचे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक असणाऱ्या सतीश धवन यांचे नाव देण्यात आले आहे.’

दरम्यान, स्पेसकिड्स इंडियाच्या संस्थापिका आणि कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. श्रीमती केसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिकेतील अंतराळ मोहिमांप्रमाणे या मोहिमेमध्ये भगवद्गीतेची प्रत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आणि फोटोही या उपग्रहाच्या पुढील पॅनलवर आत्मनिर्भर मोहिमेसोबत जोडून लावण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
अरुण गवळी होणार आजोबा; लेकीने फोटो शेअर करत दिली गोड बातमी
स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
तोंड आल्यामुळे त्रस्त आहात का? ‘हे’ उपाय करुन पाहा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.