‘हिंमत असेल तर बांधावर जा, शेतकरी पायातलं काढून तुम्हाला सांगतील’

मुंबई | केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं आंदोलन सोमवारी सुरू आहे. आज या आंदोलनाचा १२वा दिवस असून देशभरात बंद पुकारण्यात आला आहे. कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकरी दिल्लीत आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत.

याच पार्श्वभूमीवर कृषी कायद्यात बदल होणार नाही असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. आता पाटील यांच्यावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे.

ते म्हणाले, ‘हा कायदा बदलणार नाही अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे . याचा अर्थ भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हे सांगावे. मग शेतकरी पायातील काढून त्यांना हा कायदा चुकीचा कसा आहे हे सांगतील असा सणसणीत टोलाही त्यांनी मारला.

दरम्यान, कृषी कायदा बदलणार नाही, असे सांगणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री?  ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
‘WHO नं सांगितलं कोरोना लशीत विष मिसळा’, राष्ट्राध्यक्षांचा धक्कादायक दावा
देशात कोरोनाची दुसरी लाट? तज्ञ म्हणतात, कोरोना लसीशिवाय पर्याय नाही
बाबो! मरण्याआधी आजींनी शेजाऱ्यांची केली चांदी, तब्बल ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती केली नावावर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.