मुंबई | सातबारा संबधीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिजिटल सही असलेला ऑनलाईन सातबारा, गाव नमुना ८ अ व गाव नमुना नंबर ६ इ. अभिलेखास कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि घरबसल्या सगळी कामे होतील.
डिजिटल सही असलेला डेटाबेसवर आधारित ऑनलाईन सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ वर तलाठी अथवा अन्य कोणत्याही अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही. राज्यातील जिल्हाधिकारी क्षेत्रीय महसुली अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश शासनाच्या महसूल व वन विभागाने दिले आहेत.
ही सर्व माहिती महसूल व वन विभागाच्या पत्रकात सांगण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील क्षेत्रीय संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, शासनाच्या परिपत्रकानुसार डिजिटल डेटाबेसवर आधारित ऑनलाईन सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ इत्यादी अधिकार अभिलेखास कायदेशीर परवानगी देण्यात यावी.
महाराष्ट्र शासनाच्या महाभूमी पोर्टलवर उपलब्ध होणारे QR कोड व १६ अंकी तपासणी क्रमांक असलेले ऑनलाईन सही असलेल्या डेटाबेसवर आधारित ऑनलाईन गाव नमुना नंबर सातबारा, गाव नमुना नंबर ८ अ तसेच गाव नमुना नंबर ६ इत्यादी नमुन्यांचा अधिकार अभिलेख विषयक उतारा कायदेशीर व शासकीय, निमशासकीय सर्व कामांसाठी चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चांगल्या क्वालिटीचे जॅकेट ते ही एक हजारपेक्षा कमी किंमतीत, जाणून घ्या कुठे मिळतायत
बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करणारे शेखर सुमन कसे झाले टेलिव्हिजनवरचे कॉमेडी किंग