फक्त मोबाईल नंबर टाका आणि सातबारा काढून घ्या, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो.

पण डिजिटल पद्धतीचा सातबारा काढायचा कसा हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जा. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट दिसेल.

वेबसाईटच्या उजवीकडे तुम्हाला Digitally Signed 7/12 हा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यावर लॉगिन आणि पासवर्ड टाका. नवीन असाल तर नवीन अकाऊंट तयार करा. जर तुम्ही नवीन असाल तर मोबाईल नंबर टाकून तुम्ही सातबारा मिळवू शकता.

यासाठी OTP based login वर क्लिक करा. मोबाईल नंबर टाका आणि send OTP यावर क्लिक करा. मग तुमच्या फोनवर एक OTP येईल. हा OTP तुम्हाला Enter OTP च्या खालच्या रकान्यात टाकायचा आहे. त्यानंतर verify OTP वर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. यामधल्या digitally signed ७/१२ वर क्लिक करा.

नंतर जे पेज ओपन होईल त्याच्या खाली एक सूचना लिहिलेली आहे की सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील. आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे तुमच्या खात्यात इथं काही पैसे नसतील.

त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचे आहे. आता फॉर्मवर भरलेली माहिती भरा. जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड ऑप्शन क्लिक करा. तुम्हाला तुमचा सातबारा दिसेल. यासाठी कोणत्याही शिक्क्याची किंवा सहीची गरज नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.