साताऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही राजेंच्या समर्थकांत तुफान हाणामारी, अनेकजण गंभीर जखमी

सातारा । सताऱ्यातील भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद सर्वांना माहीत आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसात हा वाद कमी झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली आहे. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राज्यांच्या समर्थकांमधील सशस्त्र हाणामारीमुळे शहरात आणि राज्यभरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेंद्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिससमोर गाडी लावली. यामुळे दोघांमध्येही वाद पेटला. सुरुवातील खंदारे आणि भोसले यांच्यात बाचाबाची सुरु झाली. यामुळे हा वाद वाढला.

यामुळे दोन्ही बाजूंचे कार्यकतें थेट हाणामारीवर आले. दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्रीमुळे परिसरात मोठी खळबळ माजली. या मारामारीत शस्त्रास्त्रांचा वापर झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरोधात दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या मारामारीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारीत इतरांना देखील मारहाण करण्यात आली आहे.

या हाणामारी झाल्यानंतर दोन्ही राजेंच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. याप्रकरणी सनी भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावेळी रॉड, कोयता याचा हल्ला करण्यासाठी वापर केला आहे. राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

शहरात घडलेल्या या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकींच्या तोंडावर आता पुन्हा एकदा हवा कोणत्या गटाची? यावरून शहरात वाद सुरु झाले. आपल्या गटाची ताकद दाखवण्यासाठी हा राडा झाल्याचे अनेकांनी सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी टोलनाक्यावरून देखील असाच राडा झाला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.