साताऱ्याच्या कॉलेजमध्ये मुलींची दहश.त, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

सातारा | साताऱ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तरुणींच्या आपसातील मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. तरुणींच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलांप्रमाणे मुली सुद्धा तुफान राडा घालताना दिसत आहेत.

महाविद्यालयातील तरुणांमध्ये वाद आणि भांडणांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु यावेळी व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. यामध्ये चक्क मुली-मुलींची हाणामारी होत असल्याचे दिसते आहे. अगदी दे दना दन असं काही व्हिडीओत घडताना दिसत आहे. धावून अंगावर जाण्यापासून ते फिल्मी स्टाईलमध्ये भांडण पाहायला मिळत आहे.

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज परिसरातील मुलींच्या भांडणाचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. शहरात या महाविद्यालयाला प्रतिष्ठित समजले जाते. परंतु वारंवार तरुणींच्या मारहाणीचे प्रकार याठिकाणी घडत आहेत.

या व्हिडीओत मारामारी करणाऱ्या मुली आकरावी व बारावीच्या गणवेशातील आहेत. काही मुलींनी या मारामारीचे चित्रीकरण केले आहे. तसेच हा व्हिडीओ व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर ठेवला होता. यानंतर या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी वेळ लागला नाही. साताऱ्यात यापुर्वीही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. यामुळे सातारा शहरातील नागरीक व पालक चिंता व्यक्त करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
बारमध्ये दारु पिऊन तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पहा संपुर्ण व्हिडीओ
नवरा सोडून त्याच्या मित्रासोबतच वेड्यासारखी नाचली ‘या’ क्रिकेटपटूची बायको; पहा व्हिडीओ
 एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही टिना आणि अनिल अंबानीची लव्ह स्टोरी
 ना बायको ना मुलंबाळ तरीही मृत्यूनंतर ‘एवढी’ संपत्ती मागे सोडून गेले राजीव कपूर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.