स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने घवघवीत यश मिळवले आहे. या चित्रपटाने तिकीट बारीवर तीनच दिवसात तब्बल ८.७१ कोटींची विक्रमी कमाई केली आहे. हा चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉलीवूड(Bollywood) चित्रपटांना टक्कर देत आहे. (Sarsenapati Hambirrao movie box office collection 3 days)
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाने तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर ८.७१ कोटींची काम केल्याची माहिती देण्यात आली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लिहिले आहे की, “फक्त तीन दिवसात सरसेनापतींनीं रचला इतिहास..”
“फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे…असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा”, असे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पुढील काही दिवसांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत १५ कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज चित्रपट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/5390777137610184
या चित्रपटातील संवाद देखील लोकप्रिय झाले आहेत. “परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढा तिखट”, अशा संवादांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका केली आहे. तसेच अभिनेता गश्मीर महाजनी यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यापूर्वी ‘देऊळबंद’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट महाराष्ट्रात फार लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती.
काही दिवसांपूर्वी साऊथ मधील प्रसिद्ध अभिनेता प्रभासने देखील ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे कौतुक केले होते. प्रभासने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा टीझर पोस्ट करत एक खास ट्विट केलं होतं. “टीझर खूप आवडला. मराठीतील मोठ्या बजेटच्या या ऐतिहासिक चित्रपटाला माझ्याकडून शुभेच्छा”, असे प्रभासने ट्विटमध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् …; मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”
‘…तर घरात घुसून बदडून काढू,’ भाजपचा दीपाली सय्यद यांना गर्भित इशारा