Share

Sarpmitra : सर्पमित्रांसाठी आनंदाची बातमी! सर्पमित्रांना मिळणार सरकारी ओळख, CM कडे १० लाख विम्याची शिफारस

Sarpmitra : आपला जीव धोक्यात घालून नागरी वस्तीत किंवा ग्रामीण भागात सापांच्या शोधात आणि सुटकेसाठी धावणारे सर्पमित्र (Sarpmitra) लवकरच ‘फ्रंटलाईन वर्कर (Frontline Worker)’ म्हणून ओळखले जाणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) या महसूलमंत्र्यांनी याबाबतची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. शासनाच्या स्तरावरून सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार असून, १० लाख रुपयांचा अपघात विमा देखील लागू होणार आहे.

सर्पमित्रांचं कार्य अनमोल

शहर असो वा गाव, साप आढळल्यावर सर्वसामान्य नागरिकांची पहिली हाक असते सर्पमित्रांकडे. विषारी असो की बिनविषारी साप, त्याला जीवाची पर्वा न करता सुरक्षितरीत्या पकडून निसर्गात सोडणाऱ्या या कार्यकर्त्यांचं कार्य समाजासाठी अमूल्य आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा मिळावा, अशी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका आहे.

शासनाची महत्त्वाची पावले

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केलं की, सर्पमित्रांचे वन्यजीव संरक्षणातील योगदान लक्षात घेता त्यांना ओळखपत्र, विमा आणि अधिकृत मान्यता देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामुळे सर्पमित्रांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल.

सर्पमित्रांची वाढती संख्या 

शहरांपासून ते गावांपर्यंत सर्पमित्रांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. मात्र, त्यामध्ये प्रशिक्षित सर्पमित्रांची संख्या तुलनेने कमी आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी साप पकडणाऱ्यांमुळे अनेकदा अपघात किंवा सर्पदंशाच्या घटना घडतात. म्हणूनच शासनाने यावर लक्ष केंद्रीत करत योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनांची गरज ओळखली आहे.

सर्पमित्रच आता एकमेव आधार

पूर्वी गावागावात गारुडी किंवा नागवाले बाबा असे लोक साप पकडण्याचं काम करत असत. पण आज त्यांची जागा प्रशिक्षित सर्पमित्रांनी घेतली आहे. ही एक सामाजिक गरज बनली आहे. त्यामुळेच शासन सर्पमित्रांप्रती अधिक जबाबदारीने आणि आदराने वागण्यास तयार झालं आहे.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now