बाप सरपंच असला तरी पोर बोलते हवा फक्त आपलीच! अमित ठाकरेंचा हा फोटो होतोय तुफान व्हायरल..

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे दौरे करत फिरत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी ते घेत असून अनेकांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. त्याचा मुलगा अमित ठाकरे देखील दौरे करत आहे. यामुळे त्यांनी देखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी देखील निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती.

अमित ठाकरे हे राज ठाकरे यांच्यापेक्षा साधे दिसून येतात. याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसत आहे. मात्र, त्यावेळी अमित ठाकरे गाडीपाशी शांतपणे उभे आहेत.

हा फोटो amitthackeray.speaks या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोची सध्या प्रचंड चर्चा आहे. या आधी देखील अमित ठाकरे यांचे असे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोतील अमित ठाकरे यांचा साधेपणा अनेकांना भावला आहे.

अनेकदा गावपातळीवरील नेत्याचा देखील मोठा रुबाब बघायला मिळतो, मात्र, अमित ठाकरे यांच्यात असलेला साधेपणा या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे ना त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात, फक्त नेता असून चालत नाही. उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो, कोणताही गर्व न बाळगता हा एक दिवस महाराष्ट्राच भविष्य नक्की बदलेल, असे या पोस्टमधून म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.