असा बडा दिलवाला सरपंच पाहीजे; भन्नाट गिफ्ट देत केली गावकऱ्यांची दिवाळी गोड

औरंगाबाद | औरंगाबादजवळ एक गाव आहे त्याचे नाव आहे पाटोदा. या गावाला आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. कारण या गावातील सर्व लोक १०० टक्के टॅक्स भारतात. कोरोनाच्या काळातही या गावातील लोकांनी टॅक्स बुडवला नाही.

त्यामुळे या गावातील सरपंचाने गावकऱ्यांना दिवाळीच्या काळात एक गिफ्ट दिले ज्याचा गावकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. बाजारात ३५ रुपये प्रति किलोने विकली जाणारी साखर २० रुपयांना विकली जाते आणि तीही प्रत्येक कुटुंबाला २५ किलो.

दरवेळी या गावातील ग्रामपंचायतीचा १०० टक्के भरणा होतो. ही रक्कम फक्त धनादेशाद्वारे स्वीकारली जाते. गावात प्रत्येक परिवारातील एका माणसाचे किमान एक बँक खाते आहे. ३ हजार ३५० लोकसंख्या असलेल्या या गावाने नवा आदर्श निर्माण केला आहे.

गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी गावकऱ्यांना एक बक्षिस देण्याचे ठरवले होते म्हणून त्यांनी साखरेच्या माध्यमातून त्यांची दिवाळी गोड केली. बाहेर ३५ रुपये किलोने मिळणारी साखर त्यांना २५ रुपये किलोने मिळत आहे.

याआधीही गावात अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत जसे की, टॅक्स नियमित भरणाऱ्याला दळण फुकट, शेवया, कुरडया, पापड आणि डाळ फुकट दळून मिळते. गावातले रस्ते एकदम साफ, गावात सीसीटीव्ही कॅमेरे अशा अनेक सुविधा आहेत.

सरपंच भास्कर पेरे म्हणाले की, कोरोनाचे संकट गावपातळीवरपण आहे. त्यामुळे गावकऱ्यांची दिवाळी सुखकर जावी यासाठी आम्ही चर्चा करत होतो. त्यात एक प्रस्ताव मांडण्यात आला की गावकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर देण्यात यावी.

आम्ही काही भार उचलला आणि एका कारखान्याने आम्हाला ३० रुपये किलोने साखर देण्याचे मान्य केले. त्यानंतर आम्ही गावकऱ्यांना २० रुपये किलोने साखर देण्याचे ठरवले. कोरोनाच्या काळात गावकऱ्यांनी जर न चुकता कर भरला असेल तर त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसला पाहिजे यातून आम्हाला ही आयडिया सुचली, असे भास्कर पेरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

लाईमलाईटपासून लांब राहून शेती करत आहे राखी गुलझार

वाघीनीच्या बाता मारणाऱ्या कंगनाने घेतलाय मुंबई पोलीसांचा धसका; चौकशीला घाबरून पळतेय लांब

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.