Sardaar Ji 3 Pakistan Box Office : ‘पहलगाम’ (Pahalgam) येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात (India-Pakistan) कडक धोरण राबवले. त्यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी (Ban on Pakistani Artists in India) घालण्यात आली. एवढेच नाही, तर काही पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट्सही भारतात बॅन करण्यात आले.
याच दरम्यान, दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) या लोकप्रिय पंजाबी गायक-अभिनेत्याच्या ‘सरदार जी 3’ या चित्रपटात हानिया आमिर (Hania Aamir) या पाकिस्तानी अभिनेत्रीने काम केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
भारतात विरोध, पाकिस्तानात हाऊसफुल्ल शो!
‘सरदार जी 3’ (Sardaar Ji 3) हा चित्रपट २२ जून रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये हानिया आमिरच्या (Pakistani Actress Hania Aamir) झळकण्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर दिलजीतवर टीका झाली. परिणामी, भारतात हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र पाकिस्तानात आणि काही परदेशात चित्रपटाने जोरदार कामगिरी केली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘हाऊसफुल्ल’ शोचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, पाकिस्तानात या चित्रपटाने दुहेरी आकड्यांचा टप्पा पार केला आहे, म्हणजेच चित्रपटाने करोडोंचा गल्ला जमवला आहे.
“हिंदुस्तान कोणाच्या बापाचा नाही!”
विरोध करणाऱ्यांना दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) याने एका कॉन्सर्टमध्ये अप्रत्यक्ष उत्तर दिलं. त्याचे शब्द थेट काळजात घुसणारे होते: “अगर खिलाफ है… तो होने दो, जान थोड़ी है. ये सब दुआ है, आसमान थोड़ी है. सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.”
या वक्तव्यातून दिलजीतने विरोध करणाऱ्यांना ठाम संदेश दिला आहे की, कलाविश्व कोणत्याही सीमा मानत नाही आणि हिंदुस्थान केवळ कोणाच्या मालकीचा नाही.