साराचा कि.सींग सिन पाहून वडील सैफ अली खानने दिली धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाला…

मुंबई | अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट कुली नं १चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये दोघांची खूप चांगली केमिस्ट्री पहायला मिळते आहे. चित्रपटाचा ट्रेलर कॉमेडी आणि रोमांसने परिपूर्ण असा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

कुली नं १ चित्रपटात परेश रावल सारा अली खानच्या वडीलांच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. यात वरूण धवन वेगवेगळ्या भूमिकेत दिसतो आहे. तर पोलिसाच्या भूमिकेत जॉनी लिव्हर कॉमेडी करताना पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया आल्या आहेत. या ट्रेलरमध्ये वरुण आणि साराचे अंडरवॉटर कि सिंग सीन दाखविण्यात आले आहे, ज्यामध्ये दोघेही पाण्याखाली लिप लॉ क करताना दिसत आहेत. मुलगी साराचा हा सिन पाहून वडील सैफने देखील यावर भाष्य केले आहे.

साराचे वडील सैफला या चित्रपटाचा ट्रेलर आवडला असून याबबत बोलताना तो म्हणाला की ‘हा चित्रपट खरोखरच उत्तम असेल.’ दरम्यान, ट्रेलरच्या रिलीजला २ तासापेक्षा जास्त वेळ गेला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला ४ लाख ८० हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

‘कुली नं १’ हा चित्रपट येत्या २५ डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.

तसेच ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुशांतच्या चाहत्यांनी केली होती.  ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा सवाल वापरकर्त्यांनी विचारला आहे. यामुळे साराच्या अडचणी वाढल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार डॉ. अमोल कोल्हे…
योगी आदित्यनाथ ‘ठग’! उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यावरून मनसे आक्रमक..
…तर तृप्ती देसाईच्या तोंडाला काळ फासू; शिवसेनेच्या वाघिणीने दिला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.