माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना एका झटक्यात बरा करतो; डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतो आहे. अशातच पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर हे औषध कोरोनावर १०० टक्के रामबाण उपाय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यातील डॉ. सारंग फडके यांनी कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध तयार केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आतापर्यंत १०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते १०० टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. १ वर्षांच्या मुलापासून ७८ वर्षांच्या पेंशटला हे औषध देण्यात आले असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. फडके यांचं म्हणणं आहे.

कोरोना रुग्णांची राज्यातील संख्या ५० हजारांवर…
शनिवारी कोरोनाच्या ४९ हजार ४४७ रुग्ण आणि २७७ मृत्यूंची नोंद झाली. यापूर्वी, राज्यात शुक्रवारी ४७ हजार रुग्णांची नोंद झाली होती. आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २९ लाख ५३ हजार ५२३ झाली असून मृतांचा आकडा ५५ हजार ६५६ झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

‘ही’ टेक्नीक वापरा अन् डिशच्या रिचार्जपासून मिळवा मुक्ती; फुकट पहा तब्बल १६० चॅनेल

किशोर कुमारने दिली होती जितेंद्रला धमकी; माझ्या बायकोपासून लांब राहा नाही तर…

खळबळजनक! मुंबईतील मनसे नेत्याला मारण्याची सुपारी ठाणे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.