इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ४८ धावांची झंझावाती खेळी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने तुफान फटकेबाजी केली. पण मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला.(sara tendulkar Screamed team david wicket)
सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने जोरदार फलंदाजी केली. टीम डेव्हिडने एकाच षटकात ४ षटकार मारून सामना मुंबईच्या बाजूने फिरवला होता. पण त्याच षटकात मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिड धावबाद झाला. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.
१८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड धावबाद झाला. टीम डेव्हिड धावबाद झाल्यानंतर सारा तेंडुलकरला जोरात किंचाळली. टीम डेव्हिडच्या विकेटने सारा तेंडुलकरला मोठा धक्का बसला. यावेळी सारा तेंडुलकर स्टेडियममधील व्हीआयपी बॉक्समध्ये बसली होती. १९३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाची चांगलीच दमछाक उडाली.
या सामन्यातील १८ व्या षटकात टीम डेव्हिडने सनरायझर्स हैदराबादच्या टी नटराजन गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. या षटकात टीम डेव्हिडने तब्बल ४ षटकार ठोकले. यावेळी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. १८ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर टीम डेव्हिड धावबाद झाला.
मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने १८ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून राहुल त्रिपाठीने सर्वात जास्त धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज राहुल त्रिपाठीने ४४ चेंडूत ७६ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून उमरान मलिकने चांगली गोलंदाजी केली.
सारा तेंडुलकर नेहमीच मुंबई इंडियन्स संघांला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये येत असते. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह आहे. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. सारा तेंडुलकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
धक्कादायक! प्लास्टीक सर्जरीच्या नादात प्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला आपला जीव, फिल्म इंडस्ट्रीत शोककळा
सर्वत्र नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते मग काशीतील नंदीचे तोंड ज्ञानवापी मशिदीकडे का? जाणून घ्या अधिक माहिती..
22 वर्षांचा संसार मोडून हिमेश रेशमियाने केले दुसरे लग्न, जाणून घ्या का तुटले होते पहिले नाते