सचिनची मुलगी सारा तेंडूलकरसोबतच्या नात्यावर क्रिकेटपटू शुभमन गिलने सोडले मौन; स्पष्ट शब्दांत केला नात्याचा…

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज ओपनर शुभमन गिल जितका फेमस त्याच्या फलंदाजीमुळे आहे तितकाच फेमस तो त्याच्या लुक्समुळेही असतो. गिलच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल नेहमी चर्चा रंगलेल्या असतात.

पण आता शुभमन गिलने स्वता त्याच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला आहे. त्याने स्वता याबाबत मोठी अपडेट दिली आहे त्यानंतर त्याच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चांना पुर्णविराम लागला आहे. त्यामुळे आता सारा तेंडूलकर आणि त्याच्या रिलेशनशिपबाबत रंगलेल्या चर्चा केवळ अफवा होत्या हेच म्हणता येईल.

तर झाले असे की नुकतेच शुभमन गिलने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक प्रश्न-उत्तरे सेक्शन घेतले होते. याचवेळी एका चाहत्याने शुभमन गिलला विचारले की तु सिंगल आहेस का? त्यावर शुभमन म्हणाला की मी सिंगल आहे आणि भविष्यातही याबाबत त्याने कसलीही योजना आखलेली नाही.

या उत्तरानंतर त्याच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चांना पुर्णविराम लागलेला आहे. दरम्यान, गिलचे नाव नेहमी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या मुलीशी म्हणजे सारा तेंडूलकरशी जोडले जात होते. अनेक दिवसांपासून दोघेही यावरून ट्रोल होत होते.

त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या तेव्हा येऊ लागल्या जेव्हा दोघांनी एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स केल्या होत्या. नेटकरी नेहमी त्या दोघांच्या रिलेशनशिपला ट्रोल करायचे पण आता गिलने त्याचे उत्तर दिले आहे.

शुभमन सध्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहेत. गिल पुर्ण टीमसोबत सध्या मुंबईच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. रोज जिममध्ये तो घाम काढतो आहे. टीम इंडियाला २ जूनला इंग्लंडला रवाना व्हायचे आहे.

महत्वाच्या बातम्या
क्लार्कच्या घरी सापडले २ कोटींचे घबाड, ८ किलो सोने, नोटा मोजण्याची मशीन, सीबीआयही चक्रावली
लोकं तर लोकं आता सलमानच्या वडिलांनीही दिला ‘राधे’ला निगेटिव्ह रिव्ह्यु; म्हणाले…
मल्लिका दिसली स्विमिंगपुलमध्ये बिकीनीवर अंघोळ करताना; व्हिडिओ पाहून चाहते पण झाले घायाळ, पहा व्हिडिओ
कोरोनाचा लवकरच गेम ओव्हर! शास्त्रज्ञांनी शोधले स्वस्त आणि मस्त गुप्त हत्यार, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.